डंपरवर कारवाई

महिनाभरात १८ ट्रॅक्टर, १ डंपरवर कारवाई

परिविक्षाधीन डीवायएसपी आप्पासाहेब पवार यांची कामगिरी

जळगाव :- जिल्हा पोलीस दलास परिविक्षाधीन डीवायएसपी म्हणून लाभलेले आप्पासाहेब पवार यांनी अवैध वाळू वाहतूक आणि धंद्याविरोधात कारवाईची मोहीम हाती घेतली असून महिनाभरात त्यांनी व त्यांच्या पथकाने तब्बल १८ ट्रॅक्टर आणि एक डंपरवर कारवाई करून जप्त केले आहे. त्यांच्या या धडाकेबाज कारवाईने अवैध धंदे चालकांमध्ये वचक निर्माण झाला आहे.

जळगाव जिल्ह्यासह तालुक्यात अवैधरित्या वाळू वाहतूकीसह अवैध धंदे चालकांनी डोकेवर काढले आहे. पोलिसांकडून कारवाई करण्यात येत असली तरी कारवाईत सातत्य नसल्यामुळे त्यांचावर वचक निर्माण होत नव्हता. अशातच आप्पासाहेब पवार यांनी ९ जून २०२३ रोजी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात परिविक्षाधीन डीवायएसपी म्हणून पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी जळगाव शहरासह परिसरात सुरु असलेल्या अवैधरित्या वाळू वाहतूकीसह गुटखा, पानमसला व अवैध धंद्यांवर कारवाईला सुरुवात केली आहे.

परिविक्षाधीन डीवायएसपी आप्पासाहेब पवार व पथकातील पोलीस उपनिरीक्षक गणेश सायकर, नयन पाटील व सहकाऱ्यांनी महिनाभरातच अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे १८ ट्रॅक्टर आणि १ डंपरवर कारवाई केली आहे. यासोबतच परिसरातील अवैध धंद्यांवर देखील त्यांनी कारवाई केली आहे. त्यांच्या या धडक कारवाईमुळे अवैध व्यावसायिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या या धडक कारवाईची जनसामान्यांमध्ये देखील चर्चा आहे.

डंपरवर कारवाई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *