भरती

मुंबई :- माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमध्ये प्रशिक्षणार्थी उमेदवारांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यात मेकॅनिकल, इलेक्ट्रिशियन यासह तब्बल चौदा ट्रेडचा समावेश असून आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ही एक चांगली संधी आहे.

भरती

विद्यार्थ्यांचा मागील काही वर्षांपासून व्यावसायिक तसेच कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमांकडे कल वाढत आहे.
नवीन शैक्षणिक धोरण २०२० नुसार कौशल्यावर आधारित शिक्षणासह प्रशिक्षणाला देखील महत्व दिले गेले आहे. अप्रेंटिसशिपद्वारे काम करण्याची पद्धत सुधारत असल्यामुळे ते गरजेचे झाले आहे, याशिवाय अप्रेंटीसशिपनंतर नोकरीची संधी देखील वाढत असते.

कुशल कारागीर घडावेत यासाठी देखील सरकारी, निमसरकारी तसेच खाजगी कंपन्या, विभागात देखील अप्रेंटिसशिपसाठी भरती केली जाते. भारत सरकारचा एक उपक्रम असलेल्या माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमध्ये देखील अप्रेंटिसशिप पदांच्या 466 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. आयटीआय, ८ वी आणि १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना त्यासाठी अर्ज करता येणार आहे.

या ट्रेडचा आहे समावेश
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि.कडून ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल), इलेक्ट्रिशियन, फिटर, पाईप फिटर, स्ट्रक्चरल फिटर, फिटर स्ट्रक्चरल (Ex. ITI फिटर), आयसीटीएसएम, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, रेफ्रीजरेटर आणि एअर कंडीशनर, वेल्डर, कॉम्प्युटर ऑपरेटर
अँड प्रोग्रामिंग असिस्टंट,
कारपेंटर, रिगर, वेल्डर (गॅस & इलेक्ट्रिक) या १४ ट्रेडसाठी ही भरती केली जाणार आहे. २६ जुलै ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.

जाहिरात पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

ऑनलाईन अर्जासाठी खालील लिंकवर क्लिक करा

Click Here

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *