Cash Van

नंदुरबार :- दुचाकीने जावून एटीएममध्ये कॅश भरून येतो, असे सांगून कॅश गाडीवरील कर्मचाऱ्यानेच १ कोटी ५ लाख रुपयांची रक्कम लंपास केल्याची घटना नंदुरबार शहरात घडली आहे. या घटनेमुळे नंदुरबार जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून पोलिसांकडून जिल्हाभरात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे.

नंदुरबार शहरातील विविध बँकांच्या एटीएममध्ये कॅश भरणा करण्याचे काम रायटर कॉर्पोरेशन नामक कंपनीला देण्यात आले आहे. सोमवार दि.१४ रोजी नेहमीप्रमाणे या कंपनीचे पाच कर्मचारी चारचाकी वाहनासह कॅश कलेक्शन व भरणा करण्याच्या कामासाठी निघाले होते. स्टेट बँकेच्या एटीएममध्ये कॅश भरणा करण्यासाठी जात असतांना धुळे चौफुलीवरील एका फायनान्स कंपनीतील कॅश घेण्यासाठी गाडी थांबविण्यात आली होती.

दरम्यान, एका कर्मचाऱ्याने मी दुचाकीने जावून पोलीस मुख्यालयातील एटीएममध्ये कॅश भरुन येतो, असे सांगून निघून गेला. तब्बल दोन तास उलटल्यानंतरही हा कर्मचारी न परतल्याने उर्वरित कर्मचाऱ्यांना शंका आल्याने त्यांनी तातडीने नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेल्या प्रकारची माहिती पोलिसांना दिली. याप्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी जिल्हाभरात ठिकठिकाणी नाकाबंदी केली असून संशयिताचा कसून शोध घेतला जात आहे.

One thought on “कॅश गाडीवरील कर्मचाऱ्यानेच लांबविले १ कोटी रुपये”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *