crime news

चोपडा :- जळगाव जिल्ह्यात अवैधरित्या हत्यार बागळणे तसेच विक्री, खरेदी करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. हे प्रकार रोखण्यासाठी चोपडा पोलीसांकडून शोध मोहीम हाती घेण्यात आली असून या मोहिमेत तब्बल १३ तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांकडून ५ जणांना ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवैधरित्या हत्यार विक्री, खरेदी आणि बागळण्याऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात आली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश बुवा यांनी चोपडा तालुक्यातील अडावद, लोणी, सुटकार या ठिकाणी राबविलेल्या शोध मोहिमेत पाच जणांकडून १३ हजार रुपये किमतीच्या ११ तलवारी व दोन गुप्त्या जप्त करण्यात आल्या आहेत. सहायक पोलीस निरीक्षक गणेश बुवा, पोलीस उपनिरीक्षक जगदीश कोळंबे, चंद्रकांत पाटील, सहाय्यक फौजदार शरीफ शेख, मुकेश तडवी, ज्ञानेश्वर सपकाळे, सुनील तायडे, नासिर तडवी, विनोद धनगर, फिरोज तडवी, किरण शिरसाठ, सतीश भोई, प्रदीप पाटील, शुभम बाविस्कर, संदीप पाटील, शैलेश माळी, रमिज सैय्यद आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

पाच जणांवर गुन्हे दाखल
अवैधरित्या तलवारी बागळ्याप्रकरणी सागर भगवान महाजन (वय – २२, रा. अडावद), राहुल लक्ष्मण ठाकरे (वय – १९, रा. सुटकार), राज प्रमोद ठाकूर (वय – २१, रा. लोणी), चिरंजीव रवींद्र भोई (वय – १९, रा. अडावद ), मयूर रामेश्वर कोळी (वय – २०, रा. अडावद ) यांच्याविरुद्ध अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

One thought on “१३ तलवारीसह ५ जण ताब्यात; जळगाव जिल्ह्यात पोलिसांची मोठी कारवाई”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *