नंदुरबार :- जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील दलेलपूर येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात 11 वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवार दि. 16 रोजी घडली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

दलेलपूर (ता. तळोदा) शिवारातील गुलाब सत्तार धानका व दामू सत्तार धानका यांच्या शेतात दुपारी 12 ते 1 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. गुरुदेव भरत वसावे (वय – 11) असे या बिबट्याच्या हल्ल्यात मयत झालेल्या बालकाचे नाव आहे. घटनेचे वृत्त कळताच वनविभागाचे वनक्षेत्रपाल स्वप्नील भामरे, जाण्या पाडवी, आशुतोष पावरा, राहुल कोकणी, श्री. डोंगरे आदीनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करून पंचनामा केला. याप्रकरणी तळोदा पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

नागरिक भितीच्या सावटाखाली
दलेलपूर परिसरात बिबट्याचा मुक्त संचार असल्याने नागरिकांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक, शेतमजूर भितीच्या सावटाखाली वावरत असल्याचे दिसून येत आहे. बिबट्याच्या हल्ल्यात हा दुसरा बळी गेल्याने नागरिकांकडून रोष व्यक्त केला जात आहे. या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा, परिसरात पिंजरा लावण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

One thought on “बिबट्याच्या हल्ल्यात 11 वर्षीय बालकाचा मृत्यू”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *