चाळीसगाव : शहरातील पवारवाडी, रहेमान नगर येथील १८ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची घटना २६ रोजी घडली आहे. नौशीनबानू शकील खान असे हरविलेल्या तरुणीचे नाव असून याप्रकरणी चाळीसगाव पोलिसात हलविल्याची नोंद करण्यात आली आहे. (An 18-year-old girl is missing from Chalisgaon)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नौशीनबानू शकील खान (वय-१८) या चाळीसगाव शहरातील पवारवाडी, रहेमान नगर येथे आई – वडील, काका – काकूंसह वास्तव्यास असून त्या लहानपणापासून मुकबधीर आहेत. दि. २६ रोजी त्यांचे काका नासिर खान हैदर खान पठाण (वय-५५), हे नेहमीप्रमाणे कामावर गेले होते. दुपारी २.३० वाजेच्या सुमारास ते जेवणासाठी घरी आले, तेव्हा त्यांच्या पत्नी इरफाना यांनी नौशीनबानू या एका तासापूर्वी घरातून गेल्या असून अद्यापपर्यंत परतले नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी तातडीने नातेवाईकांकडे संपर्क साधला तसेच शहरातील मालेगाव रोड, रेल्वे स्टेशन, बस स्टॅन्डसह परिसरात शोध घेतला. मात्र, नौशीनबानू या मिळून न आल्याने त्यांनी तातडीने पोलिसात धाव घेत माहिती दिली.

याप्रकरणी नासिर खान हैदर खान पठाण (वय-५५, रा. पवारवाडी, रहेमान नगर, चाळीसगाव), यांनी खबरीवरून चाळीसगाव शहर पोलिसात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *