जळगाव :- येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या शुल्क निश्चिती समितीच्या सदस्यपदी सी.ए. हितेश किशोर आगीवाल यांची निवड करण्यात आली असून त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचा कुलगुरू प्रा. विजय माहेश्वरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सी.ए. आगीवाल यांची विद्यापीठाच्या वित्त विभागाच्या वैधानिक/ए.जी. लेखापरीक्षणाच्या अनुपालन अहवालाचा आढावा उपसमितीवर देखील सदस्य म्हणून नामनिर्देशन करण्यात आले आहे. यावेळी बोलतांना आगीवाल यांनी कुलगुरू माहेश्वरी यांचे आभार मानत आपल्या प्रतिष्ठित विद्यापीठाचे भविष्य घडविण्यात तसेच सर्व पात्र विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची सुलभता सुनिश्चित करण्यात आपण या नवीन भूमिकेत प्रयत्नशील असू, आश्वासन दिले. सी.ए. आगीवाल यांच्या निवडीबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील, कुलगुरू प्रा. विजय माहेश्वरी, वित्त व लेखा अधिकारी सी.ए. रविंद्र पाटील आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *