दोंडाईचा :- आदिवासी पारधी महासंघाच्यावतीने क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी जननायक बिरसा मुंडा, भगवान वीर एकलव्य, समशेर सिंग पारधी, छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले.

दोंडाईचा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार व मान्यवरांनी महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करून मनोगत व्यक्त करून आदिवासी तरुण पिढीला शैक्षणिक व सामाजिक संदेश दिला. महासंघाच्या मालपुर शाखा अध्यक्ष वना मुंगल पारधी यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास उपसरपंच भारतीबाई वाडीले, माजी सरपंच हेमराज पाटील, विरेंद्र गोसावी, लक्ष्मण पानपाटील , माजी उपसरपंच जगदीश खंडेराय, अरुण धनगर, ग्रामपंचायत सदस्य अजय साळवे, धनराज इंदवे, बापू शिंदे, गुरुकुल इंग्लिश स्कूलचे चेअरमन युवराज सावंत, पत्रकार मोहन चव्हाण व जितेंद्र गिरासे उपस्थित होते. सुभाष ठाकरे यांनी सूत्रसंचालन केले. यशस्वीतेसाठी विनोद जमादार, वना सुर्यवंशी, पोलीस शिपाई हिरालाल सुर्यवंशी आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *