जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप

Jalgaon District News : जळगाव जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद व नगरपंचायतीकडील दिवंगत अधिकारी – कर्मचाऱ्यांच्या १८ वारसांना शासकीय नियुक्ती देण्यात आली आहे‌. नियुक्ती पत्रांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन व मदत, पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत वाटप करण्यात आले. यावेळी नोकरी प्राप्त उमेदवारांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

जिल्हास्तरीय गट ‘क’ व ‘ड’ ची सामायिक प्रतिक्षा सूचीतील १८ उमेदवारांना जिल्ह्यातील नगरपरिषदांमध्ये नियुक्तीचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या स्वाक्षरीने देण्यात आले आहेत. शिफारस यादीतील या पात्र उमेदवारांना भुसावळ, पाचोरा, रावेर, चाळीसगाव, अमळनेर, चोपडा, जामनेर, फैजपूर या नगरपरिषदेत नियुक्ती देण्यात आली.

कार्तिक ढाके, जुबेर अब्दुल सत्तार गवळी, ज्ञानेश्वर रिजल, वाजिद खान मुसा खान, शुभम भांडे, जयेश सोनार,‌ आरिफ बेग सरवर बेग, धीरज वारे, गौरव सपकाळे (भुसावळ), भावेश पाटील, मयुर पाटील, शितल कंडारे (पाचोरा), प्रभात बागरे (रावेर), आशितोष राजपूत (चाळीसगाव), धनंजय पाटील (अमळनेर), तुषार साळुंखे (चोपडा), उदय पारधे (फैजपूर), दिनेश मनोहर दलाल (जामनेर) या उमेदवारांना लिपिक,‌ वाहनचालक, शिपाई, फायरमन, पंप‌ ऑपरेटर, प्रयोगशाळा सहायक, व्हॉलमन, फायरमन या पदांवर अनुकंपा नियुक्ती देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *