वाघूर पंपिंग स्टेशनवरील वीज पुरवठा खंडित; पाणीपुरवठा एक दिवस उशिराने

जळगाव :- शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर पंपिंग स्टेशनचा वीज पुरवठा खंडित झाला असून शहराला करण्यात येणारा पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे ढकलण्यात आला आहे.

महानगरपालिकेच्यावतीने जळगाव शहराला वाघुर पंपिंग स्टेशन येथून पाणीपुरवठा केला जातो. दरम्यान बुधवार दिनांक 26 रोजी सकाळी दहा वाजेपासून स्टेशनचा वीजपुरवठा खंडित झाल्याने शहराला पाणीपुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे महानगरपालिकेच्या आणि पुरवठा विभागाच्यावतीने पाणीपुरवठा एक दिवस उशिराने करण्यात येणार आहे.

दिनांक 26 रोजी करण्यात येणारा पाणीपुरवठा 27 रोजी तर 27 रोजी करण्यात येणारा पाणीपुरवठा 28 व 28 रोजी करण्यात येणारा पाणीपुरवठा 29 रोजी करण्यात येणार आहे.
त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *