Journalist

आ. किशोर पाटील यांच्यावर कारवाई करा; १८ पत्रकार संघटनांची मागणी

धुळे :- राज्यात पत्रकारांवर होत असलेले हल्ले व पत्रकार संरक्षण कायदा अस्तित्वात असतांनाही त्याची अमलबजावणी होत नसल्याच्या निषेधार्थ धुळ्यात विविध पत्रकार संघटनांनी एकत्र येऊन पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करत सरकार विरोधात रोष व्यक्त केला. यावेळी जिल्हा पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन कायद्याची कठोर अंमलबजावणी करून पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांच्यावर कारवाई करण्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या पुढाकाराने विविध १८ संघटनांनी एकत्र येऊन गुरुवार, दि.१७ रोजी राज्यभर एकाच दिवशी पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करून आंदोलन केले. धुळ्यात मराठी पत्रकार परिषेदेशी संलग्न पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती यांच्या पुढाकाराने धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ, भारतीय पत्रकार संघ, खान्देश पत्रकार संघ, धुळे तालुका मराठी पत्रकार संघ, जनग्रामीण पत्रकार संघ, व्हॉइस ऑफ मीडिया यांच्यासह इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी, छायाचित्रकार यांनी धुळे शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यानजीक एकत्र येऊन आपली एकजूट दर्शवली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांचा, हल्ले करणाऱ्यांचा आणि कायद्याची अमलबजावणी न करणाऱ्या सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी पत्रकारांनी जोरदार घोषणाबाजी करत पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करून आपला रोष व्यक्त केला. त्यानंतर सर्व पत्रकारांनी पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांची भेट घेऊन चर्चा करून पत्रकारांच्या सुरक्षिततेबाबत कायद्याची सक्त अंमलबजावणी करण्यात यावी, पाचोरा (जिल्हा – जळगाव) येथील घटनेत पत्रकारास शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्या आ. किशोर पाटील यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांचे विधानसभेतील सदस्यत्व रद्द करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन देण्यात आले.

आंदोलनात प्रा. अनिल चव्हाण , मनोज गर्दे, देवानंद अहिरे, अतुल पाटील, राजेंद्र गर्दे, गोपी लांडगे, बापू ठाकर, नथ्थू गुजर, अरुण पाटील, रोहिदास हाके, दिलीप विभांडीक, रवींद्र इंगळे, प्रभाकर सूर्यवंशी, राजेंद्र सोनार, शैलेश साळे, चुडामण पाटील, मिलिंद बैसाणे, सुनील पाटील, रणजित शिंदे, गोरख पाटील, किशोर पाटील, अजय भदाणे, शिवाजी पाटील, सतीश भावसार, गजेंद्र पाटील, भटू पाटील, विशाल पाटील, राकेश गाळनकर, विठोबा माळी, दिपक देवरे, उमाकांत पाटील, प्रमोद वाणी, अमोल पाटील, पी. एल. पाटील, हेमंत जगदाळे, मनिष मसोळे, धनंजय गाळनकर, बी. के. सूर्यवंशी, धनंजय दिक्षीत, नितीन इंगळे, दिग्विजय गाळणकर, योगेश इशी, चंद्रकांत महाजन, महेंद्र येवले, भरतसिंग राजपूत, उमेश कढरे, जॉनी सर, मुरलीधर जाधव, सचिन बागुल, रामकृष्ण पाटील, रमेश बोरसे, संजय देवरे, संदीप अहिरे, रमेश करणकाळ, एम. जे. मकासरे, मालेगाव येथील महाराष्ट्र रक्षक न्यूजचे युसूफ पठाण यांसह असंख्य पत्रकार बांधव उपस्थित होते. तर आंदोलनाला हेमंत मदाने, योगेंद्र जुनागडे, आशुतोष जोशी, प्रा. जसपाल सिसोदिया, राजेंद्र शर्मा, निखिल सूर्यवंशी, विलास पवार, संतोष मासोळे, नितीन जाधव, निलेश भंडारी, निलेश बोरसे, धर्मेंद्र जगताप, राम निकुंभ आदींनी पाठिंबा दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *