MIDC Recruitment

मुंबई :- महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अर्थात MIDC मध्ये ८०२ जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली असून इयत्ता १०वी उत्तीर्ण ते पदवी, अभियांत्रिकी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीची मोठी संधी या ठिकाणी उपलब्ध झाली आहे. २ सप्टेंबर पासून online अर्ज सादर करता येणार असून २५ सप्टेंबर अंतिम मुदत असणार आहे.

जाहीर करण्यात आलेल्या भरतीमध्ये कार्यकारी अभियंता (स्थापत्य) – 03, उप अभियंता (स्थापत्य) – 13, उप अभियंता (विद्युत/यांत्रिकी) – 03, सहयोगी रचनाकार – 02, उप रचनाकार – 02, उप मुख्य लेखा अधिकारी – 02, सहाय्यक अभियंता (स्थापत्य) – 107, सहाय्यक अभियंता (विद्युत/यांत्रिकी) – 21, सहाय्यक रचनाकार – 07, सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ – 02, लेखा अधिकारी – 03, क्षेत्र व्यवस्थापक – 08, कनिष्ठ अभियंता  (स्थापत्य) – 17, कनिष्ठ अभियंता (विद्युत/यांत्रिकी) – 02, लघुलेखक (उच्च श्रेणी) – 14, लघुलेखक (निम्न श्रेणी) – 20, लघुटंकलेखक – 07, सहाय्यक – 03, लिपिक टंकलेखक – 66, वरिष्ठ लेखापाल – 06, तांत्रिक सहाय्यक (श्रेणी-2) – 32, वीजतंत्री (श्रेणी-2) – 18, पंपचालक (श्रेणी-2) – 103, जोडारी (श्रेणी-2) – 34, सहाय्यक आरेखक – 09, अनुरेखक – 49, गाळणी निरीक्षक – 02, भूमापक – 26, विभागीय अग्निशमन अधिकारी – 01, सहाय्यक अग्निशमन अधिकारी – 08, कनिष्ठ संचार अधिकारी – 02, वीजतंत्री (श्रेणी-2) (ऑटोमोबाईल) – 01, चालक तंत्र चालक – 22, अग्निशमन विमोचक – 187, या पदांचा समावेश असून पद नुसार शैक्षणिक अर्हता ठरविण्यात आहे.

कोणत्या पदासाठी काय शैक्षणिक अर्हता, वयाची अट, शुल्क आदी माहितीसाठी संबंधित जाहिरात वाचणे गरजेचे आहे त्या साठी खाली लिंक दिलेली असून त्या लिंक वर जाऊन तुम्ही जाहिरात डाउनलोड तसेच अर्ज करू शकतात.

जाहिरात डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://www.midcindia.org/recruitment/

अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://www.midcindia.org/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *