जळगावच्या मराठमोळी डॉक्टर तरुणीने फडकवला रशियामध्ये तिरंगा. रशियाच्याकजान स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी कझान या ठिकाणी मिस पर्ल ऑफ द वर्ल्ड 2023 ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा घेण्यात आली होती. जगातील विविध 14 देशातल्या मुलींनी आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केलं त्यामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी कुमारी उत्कर्षा विष्णू राणे या डॉक्टर युवतीस मिळाली.

Dr.utkarsha patil

उत्कर्षा ही रशियाच्या कजान स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी मध्ये एमबीबीएसच्या चौथ्या वर्षांमध्ये शिक्षण घेत आहे आणि या स्पर्धेचं फर्स्ट रनरप प्राइस डॉ. उत्कर्षाने जिंकलेला आहे. या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी सहा विविध टप्प्यांमधून जावे लागले विशेषतः बुद्धिमत्ता, संवाद कौशल्य, आत्मविश्वास, सार्वजनिक सादरीकरण ,प्रतिभा शक्ती , देशप्रेम, स्वयंपाक कला,अशा विविध बाबींचा समावेश होता. या स्पर्धेत परफॉर्म करताना डॉक्टर उत्कर्षाने जगासमोर आपल्या महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहास सोनेरी पान म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचे महान कर्तुत्व व्यक्त करणारा पोवाडा सादर केला.पोवाडा सादरीकरणासाठी लागणारे सर्व कॉस्ट्यूम इतर साधने रशियामध्ये उपलब्ध नसताना त्याची जुळवा जुळव करणे तसेच काही साधने कपडे स्वतः व मैत्रिणींच्या सोबत तयार करणे याच्यात त्यांचे चांगलीच दमछाक उडाली.आपल्या देशाची संस्कृती, गौरवशाली इतिहास ,परंपरा या सर्व गोष्टींना जगभरातील लोकांनी भरभरून दाद दिली…जळगाव गस चे तज्ञ संचालक राम पवार यांची पुतणी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *