Z P Bharati

मुंबई : राज्यभरातील ‘जिल्हा परिषद’ मधील गट ‘क’ संवर्गातील तब्बल १९ हजार ४६० पदे सरळसेवेने भरती करण्याबाबतची जाहिरात राज्य शासनाच्यावतीने शनिवार (दि.५ ऑगस्ट) रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीश महाजन यांनी बाबत प्रसारमाध्यमांना माहिती दिली आहे.

ग्रामविकास विभागातर्फे भरती करण्यात येणाऱ्या पदांमध्ये आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला), औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ यांत्रिकी, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक (लिपिक), कनिष्ठ सहाय्यक (लेखा), तारतंत्री, जोडारी, पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, यांत्रिकी, रिगमन (दोरखंडवाला), वरिष्ठ सहाय्यक लिपिक, वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्तार अधिकारी (कृषी), विस्तार अधिकारी (सांख्यिकी), विस्तार अधिकारी (शिक्षण), विस्तार अधिकारी (पंचायत), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/लघुपाटबंधारे), लघुलेखक (उच्चश्रेणी) या ३० संवर्गातील पदांचा समावेश आहे. ऑनलाईन (Online) अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2023 आहे.

अशी आहे जिल्हानिहाय पद संख्या
अहमदनगर – 937, अकोला – 284, अमरावती – 653, नांदेड – 628, छ. संभाजीनगर (औरंगाबाद) – 432, बीड – 568, भंडारा – 320, बुलढाणा – 499, चंद्रपूर – 519, धुळे – 26, गडचिरोली – 581, गोंदिया – 339, हिंगोली – 204, जालना – 30, जळगाव – 626, कोल्हापूर – 728, लातूर – 476, नागपूर – 557, नंदुरबार – 475, नाशिक – 1038, उस्मानाबाद – 453, पालघर – 991, परभणी – 301, पुणे – 1000, रायगड – 840, रत्नागिरी – 715, सांगली – 754, सातारा – 972, सिंधुदुर्ग – 334, सोलापूर – 674, ठाणे – 255, वर्धा – 371, वाशिम – 242, यवतमाळ – 875.

अधिकृत संकेतस्थळ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://rdd.maharashtra.gov.in/en

जाहिरात डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://drive.google.com/drive/folders/1wr47fMXpTTxyNedOKjNSYtGPo36T0yJh

ऑनलाईन (Online) अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/

One thought on “ZP Bharati 2023 : राज्यभरातील ‘जिल्हा परिषद’मध्ये मेगा भरती”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *