नवी दिल्ली : – नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांसाठी भारत सरकारचा एक उपक्रम असलेल्या नॉर्दर्न कोलफिल्ड लि. (Northern Coalfields Limited) मध्ये नोकरीची संधी आहे. नॉर्दर्न कोलफिल्ड लि.च्यावतीने अप्रेंटिस पदांच्या 700 जागांसाठी भरती (NCL Recrutment) जाहीर करण्यात आली असून अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेला देखील सुरुवात झाली आहे.

नॉर्दर्न कोलफिल्ड्स लिमिटेड एक मिनी रत्न कंपनी असून कोल इंडियाची उपकंपनी आहे. ही कंपनी भारत सरकारचा एक उपक्रम असून कोळसा मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत कार्य करते. एनसीएलच्यावतीने कॉम्प्युटर ऍप्लिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन, फार्मसी, कॉमर्स, सायन्स, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, माइनिंग, कॉम्प्युटर सायन्स या विषयातील पदवीधर तर इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, माइनिंग या विषयातील डिप्लोमा उत्तीर्ण उमेदवारांसाठी अप्रेंटिस पदांच्या 700 जागांसाठी भरती केली आहे.

वयाची अट 30 जून 2023 रोजी 18 ते 26 वर्षे असून अनुसूचित जाती (SC) अनुसूचित जमाती (ST) तील उमेदवारांना 5 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग (OBC) तील उमेदवारांना 3 वर्षे सूट देण्यात आली आहे. अर्ज सादर करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नसून ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत ३ ऑगस्ट आहे. नोकरीचे ठिकाण मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेश असणार आहे. अधिक माहितीसाठी, जाहिरात डाउनलोड करण्यासाठी तसेच ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

नॉर्दर्न कोलफिल्ड लि. (Northern Coalfields Limited) अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
https://www.nclcil.in/

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
https://nclapprentice.cmpdi.co.in/OurPeople/OnlineApplications/nclRect.php

जाहिरात डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *