पोलीस अधिक्षकांच्या हस्ते खोटेनगर, चंदूअण्णा नगर येथे कॅमेऱ्याचे उद्घाटन

जळगाव :- जिल्हा पोलीस दलाच्यावतीने ‘एक कॅमेरा पोलिसांसाठी’ उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमा अंतर्गत नुकतेच महामार्गावरील खोटेनगर आणि जुन्या महामार्गावरील चंदुआण्णा नगर येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येवून त्यांचे लोकार्पण करण्यात आले.

परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक आप्पासाहेब पवार यांच्या संकल्पनेतून आणि लोकसहभागातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस अधीक्षक एम. राजकुमार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत, रोटरी क्लबचे धनराज कासट, नगरसेवक मनोज चौधरी आदी उपस्थित होते. खोटेनगर येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी रोटरी क्लब ऑफ स्टारचे तर चंदुआण्णा नगर येथील सीसीटिव्ही कॅमेऱ्यांसाठी हिरा एजन्सीचे सहकार्य लाभले आहे.

गुन्हे उघडकीस येण्यास होणार मदत
पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील व मान्यवरांच्या हस्ते सीसीटिव्ही कॅमेऱ्यांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी बोलतांना पोलीस अधीक्षक एम. राजकुमार म्हणाले की, जळगाव शहरात प्रवेश केल्यानंतर खोटेनगर आणि जुन्या महामार्गावर चंदुआण्णा नगर हा चौक अत्यंत महत्त्वाचे आहेत. शहरात येणारी – जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या चौकातूनच जावे लागते. परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक आप्पासाहेब पवार यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमामुळे गुन्हे उघडकीस येण्यास मदत होणार आहे. अवैधरित्या होणाऱ्या वाहतुकीस आळा बसणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *